चिमूर तालुक्यातील अन्न पुरवठा अधिकारी यांची छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे तक्रार दाखल

गदगाव येथील गावकऱ्यांनी केली तक्रार

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - शेडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार नत्थु राऊत यांचे मृत्युपश्चात मौजा गदगांव येथील स्वस्त धान्य दुकान चिमूर तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक फुलके यांचेशी संगनमत करून बेकायदेशीररित्या राऊत यांचा मुलगा सुधाकर राऊत चालवित असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून सदर दुकानदार व त्यास सहकार्य करीत असलेल्या अधिका-यांवर योग्य ती कार्यवाही करुन मौजा गदगांव येथील शिधापत्रिका २ कि.मी. अंतरावर असलेल्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्यात यावे अशी तक्रार गावकऱ्यांनी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री म.रा.मुंबई - ३२ यांना केली आहे.सदर दुकानदार नत्थु राऊत मरण पावल्याने ती स्वस्त धान्य दुकान शिवापूर बंदर येथील रमेश मेश्राम यांना तात्पुरते जोडण्यात आले.परंतु आनंदाच्या शिधा किट चे वाटप असो अथवा स्वस्त धान्य हे शिवापूर बंदर चे दुकानदार रमेश मेश्राम यांनी वाटप करायला हवे असे न करता मृतक दुकानदार नत्थु राऊत यांचे अपत्य सुधाकर राऊत हेच करीत आहेत. तसेच शिधा पत्रिका धारकांना नाव  कमी करण्यासाठीचे दाखले तसेच नाव रेशनकार्ड वर चढविण्याचे दाखले सुद्धा चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य रित्या देण्याचे काम करीत आहे. व सर्रासपणे व्हॉट्सऍप गृप वर मॅसेज लिहून जनतेला सांगतो की धान्य दुकान माझेकडेच आहे.असा संदेश देखील जनतेत वायरल केल्या गेला.या व्यक्तीला हे अधिकार दिले तरी कोणी याची पुरेपूर तपासणी करून दोषी अधिकारी तथा गैर मार्गाने चालविणारा स्वस्त धान्य दुकान चालक यांचेवर रीतसर कारवाई करण्यात यावी व स्थानीक जनतेला होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]