राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी अजीत दादा गटात.

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी अजीत दादा गटात.

जिल्ह्यात परत शरद पवार गटाला धक्का.


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक ०८ ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी व कार्याचा आढावा घेण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

यामध्ये तालुका व विधानसभा निहायपदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्याला हातभार लावीत पक्ष बांधणीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा हे मार्गदर्शन केले. 

या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोमानी यांनी उपस्थिती दर्शवीत खासदार प्रफुल पटेल व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेंशी समन्वय साधत पक्षाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये जाऊन युवक संघटना बांधणी केली. आता त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आजपासुन अजित दादा यांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले. यामुळे सर्वच पदाधिकारी आम्हच्या सोबत आहे हे ओरड करणाऱ्यां शरद पवार गटातील नेत्यांची थोडक्यात पंचाईत झाली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सभेला प्रदेश सहसचिव आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी अध्यक्ष सुजित उपरे, सुनील काळे, विलास नेरकर, महेंद्र चंडेल, शरद जोगी, अविनाश राऊत, अरविंद रेवतकर यांचेसह मोठ्या संख्येंने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]