धम्मचक्र प्रवर्तन दिन ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे साजरा आहे
               डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देऊन या देशात धम्मक्रांती म्हणजेच विज्ञान क्रांती घडवून आणली. त्याचीच आठवण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नवेगाव पांडव येथील  आर्मी ऑफिसर बिंदु उध्दव रडके यांच्या हस्ते पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतीष्ठीत नागरिकांच्या हस्ते या दिवसाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती परिसरात झाडे लावण्यात आले. यावेळी मान.शशिकांत नारायण राहाटे, बंसीलाल चुर्हे, पांडुरंग जी रामटेके, विध्या मेश्राम मॅडम,  कोराणकर सर , मान.बरडे मेडम  , अभिजित चौधरी  प्रा.आ .के. उध्दव जी रहाटे  मान्यवरांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . 
                या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली. "हिंदू म्हणून मी जन्माला आलो  ते माझ्या हातात नव्हत,पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे" , २१ वर्षे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला.सर्वात श्रेष्ठ धर्म त्यांना बुध्द धम्म वाटला. १४आक्टोबर १९५६ ला  नागांची नाग नगरी नागपुर मध्ये स्वतः , ७ लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्मा ची  दीक्षा घेतली. तो दिवस म्हणजे धम्मचक्र अनुप्रवर्तन  दिन होय. 
            पांडुरंग जी रामटेके यांनी  " अमृताची आलीं फळे भिमा तुझ्या जन्मामुळे"  असे म्हणत या  दिवशी आम्हाला नवा जन्म  डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर तुमच्या मुळेच मिळाला .नाही तर आज इथला शोषित समाज कोणत्या अवस्थेत असता. या कार्यक्रमाला उपस्थित मान.बर्डे (रणदिये मेडम) पुष्पा मेश्राम आं. से.,सरिता मेश्राम आं.से., अल्काताई फुकट आं.से., व मदतनीस आशाताईं मुरकुटे, खुशबू फुकट, गावातील प्रतिष्ठित हरिश्चंद्र रामटेके, भिमराव सोनटक्के, नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी परिश्रम घेतले कर्मचारी विजय नवघडे, अतुल पांडव , संचालन कोराणकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेगाव पांडव यांनी केले.आभार अतुल पांडव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]