पिकाला पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

दिवसा लाईट नसल्याने गेला जीव

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून विज वितरण कंपनी कडून कृषी पंपाना रात्रौला विज दिली जाते. त्यामूळे  शेतपिकाला पाणी देण्याकरीता वहाणगाव येथील शेतकरी कू.नितीन जूमनाके यास दिनांक.२३/१०/२०२३ ला रात्रौ १०  वाजताच्या दरम्यान सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला.लाईट दिवसा असती तर शेतकरी मुलाला जीव गमवावा लागला नसता. म्हणून या शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या जुलमी सरकारचा वहाणगाव वासीय शेतकऱ्यांकडून उपजिल्हा रुग्णालय चिमूर च्या आवारात जाहीर निषेध करण्यात आला.व रात्री लाईट देण्याऎवजी दिवसा देण्यात यावी अन्यथा मृत शेतकरी यांचे प्रेत हलविणार नाही अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मेश्राम तथा चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या उपस्थितीत शांततेच्या मार्गात हे आंदोलन पार पडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]