जनाळा ग्रामसभा सशक्तीकरणसाठी महिलांनी उचलले एक पाउल पुढे,फुलझरीवासी देणार साथ!


मुल
आज वनहक्क कायदा २००६ नुसार मिळालेला सामुहिक वनहक्क प्राप्त गाव जनाळा तालुका मुल  येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हे गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्यात  सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीची सर्व पदाधिकारी व सभासद  ९० टक्के महिलांचा सहभाग आहे . ग्रामसभेला अधिक सक्षम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत सामुहिक वनक्षेत्राचा विकास व रोजगार निर्मिती हे  ग्रामसभेचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात, फुलझरीचे सामुहिक वनहक्क समितीचे अध्यक्ष राजू उइके यांनी फुलझरी ग्रामसभा  सशक्तीकरण व ग्रामसभेने केलेले नियम याची माहिती दिली, ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करतांना एक सक्षम ग्रामसभा आपल्या सलग्न असलेल्या दुसऱ्या गावाची ग्रामसभा करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन टाटा सामाजिक  संस्थेचे प्रतिनिधी नीतिन ठाकरे यांनी केले .
सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी म्हणजे सामुहिक वनहक्क व्यवस्थापन आरखाद्याचा ठराव मंजूर करणे. याशिवाय, सक्षमीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ग्रामसभा रोहयो समितीची निवड करण्यात आली आहे. या हँडहोल्डिंग पॉलिसीनुसार , प्रत्येक सशक्त ग्रामसभा इतर ग्रामसभांना त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासात सहाय्य आणि समर्थन करण्यास सक्षम असेल. हा सहयोगी प्रयत्न सामुहिक वनहक्क प्राप्त समुदायांच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीला हातभार लागेल .सदर ग्रामसभेत प्रवेश सुटे, अंकुश कस्तुरे, निखिल गेडाम, राजकुमार सयाम, समीहिक वनहक्क समितीचे सर्व पदाधिकारी व जनाळा  ग्रामस्थांचा  सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]