चिमूर तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानदार करतात महिन्यातुन दोन ते तीन दिवसच धान्य वाटप

अनेक राशन कार्ड धारक लाभार्थी यांना मिळतच नाही राशन

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष म्हणावे की आर्शिवाद

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - स्वस्त धान्य दुकानाचे वेळापत्रक हे ३० दिवसांचे असून चिमूर तालुक्यात मागील काही महिण्यापासुन स्वस्त धान्य दुकानदार महिण्याच्या सेवटच्या तारखेला २ ते ३ दिवसच धान्याचे वाटप करून महिना संपला व थंबची मशीन बंद झाली अश्या प्रकारचे उत्तर देऊन अनेक लाभार्थी यांना स्वस्त धान्य पासुन वंचित ठेवण्याचे काम अधिकारी व स्वस्त धान्य दुकादार करीत आहे असे यावरून लक्षात येते.तसेच राशन कार्डावर परिवारातील सदस्यांची नावे चढविली असता नावे ऑनलाईन करून सुध्दा अनेकांना धान्य वाटप करण्यात येत नाही.बरेश्या नागरीकाना कामासाठी बाहेर गावी जावे लागते अश्या वेळी २ ते ३ दिवसात धान्य न नेल्यास किंवा मशीन मध्ये थम न झाल्यास अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागते. म्हणजे लाभार्थीचा तो धान्य गाळ होतो.मग हे धान्य जाते तरी कुठे याकडे अधिकाऱ्याचे नेहमीच दुर्लक्ष का? याचा जनतेला विचार करावा लागत आहे.चिमुर तालूक्यातुन बरेचशे व्यापारी सर्रासपणे स्वस्त धान्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ट्रक द्वारे नागपुर, गोंदीया,भंडारा यासारख्या ठिकाणी धाण्याची विक्री केली जात आहे. पण आता पर्यंत या व्यापारावर अधिकाऱ्या कडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.स्वस्त धान्य दुकानदाराने कमीत-कमी धान्यांची उचल केल्यापासून शासकीय नियमानुसार वाटप सुरू ठेवण्यात यावे अशी नागरीका कडून मागणी केली जात आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]