ग्राम पंचायत धानोरी गावामध्ये स्वच्छ गाव स्वच्छ भारत मोहीम अभियानास सुरुवात

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक. १ ऑक्टोंबर २०२३ ला ग्राम पंचायत धानोरी या गावांमध्ये स्वच्छ गाव स्वच्छ भारत अभियान या मोहीम अंतर्गत गावातील ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य शाळेतील मुले शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर व गावकरी समस्त नागरिक या  सर्वांच्या मदतीने आपला स्वतःचा गाव स्वच्छ दिसावा म्हणून संपूर्ण गावातील मान्यवर शिक्षक सेविका व गावातील समस्त नागरिक यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन सार्वजनिक  ठिकाणातील गवत काळी तसेच कुजलेला कचरा साफ करून तो एका जागी जमा केला. व सभोवतालचा परिसर सुंदर कसा दिसेल अशाप्रकारे व्यवस्थित स्वच्छता करून गावाची स्वच्छतेबाबत ची प्रतिमा उंचावून गावाची वाटचाल हे नेहमी सदैव स्वच्छतेकडेच राहावी असा संदेश दिला आणि त्यामधून घाणीचे साम्राज्य नष्ट व्हावे हि गावातील लोकांनी कल्पना साधून एकजुटीने स्वतःचा गाव स्वच्छ केला. त्यामध्ये शाळेतील सभोवतालचा परिसर ग्राम पंचायत जवळील परिसर सुद्धा साफ करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]