विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून नहरात बुडालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन

सावली - सावली येथे गणपती विसर्जना दरम्यान  नहरात बुडून मृत्यू झाल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आज चांदली बुज. व सावली येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. व निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली.
      सावली शहरातील जय बजरंग युवा गणेश मंडळाची गणेश मूर्ती शनिवारी रात्रौ विसर्जनाकरिता गोसेखुर्द नहरात नहरात नेण्यात आली.  गणपती विसर्जन करिता सात ते आठ जण नहरात उतरले. नहराचा प्रवाहा जास्त असल्याने पाण्यात उतरलेले वाहून जात असल्याचे  लक्षात आल्यानंतर प्रयत्न चालवून  बाहेर काढले. मात्र सदर अनुचित घटनेत तीन तरुणांचा करुण अंत झाला. यात सावली येथील सचिन मोहुर्ले, चांदली बुज  येथील संदीप गुंडावार, नीकेश गुंडावार यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ सावली दौरा करून सावली तालुक्यातील चांदली व सावली येथील गुंडावार व मोहूर्ले कुटुंबीयांचे सांत्वन पर भेट घेऊन  आपल्या दुःखात सहभागी ग्वाही देत आर्थिक मदतही केली. याप्रसंगी प्रामुख्याने माजी जि.प. उपाध्यक्ष संदीप  गड्डमवार, माजी जि.प.सभापती .दिनेश चीटनुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, माजी प.स.सभापती विजय कोरेवार, सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार, माजी उपसभापती मंगला चिमड्यालवार, महिला शहराध्यक्षा भारती चौधरी, सावली नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका तथा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]