घोडाझरी तलावाच्या पाळीला पडलेल्या भोगदाळाने लाखो लोकांचे जीव आले मुठीत.यश कायरकर;(तालुका प्रतिनिधी)
          नागभीड तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असलेला इंग्रजांनी जवळपास एकशे दहा वर्षांपूर्वी बांधलेला हा घोडाझरी तलाव  परिसरातील धान उत्पादकांच्या शेतांच्या सिंचनासाठी इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केलेली होती. मात्र अत्यंत सुरक्षितपणे शंभर वर्षांपर्यंत चालले कार्य  आठ दहा वर्षांपूर्वीपर्यंत या तलावातून नहराद्वारे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होऊन सुरुवातीला तीन हजार हेक्टर तर आता सहा ते सात हजार हेक्टर शेतजमीन ला सुरक्षित पाणी पुरवठा होत होता. मात्र येत्या नऊ-दहा वर्षात सिंचन विभागाला लागलेली झोप म्हनावी की काय.? की या सिंचन विभागाचा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणे मुळे किंवा या नहराचा व घोडाझरी तलावाचा रखरखाव योग्य पद्धतीने न होत असल्यामुळे सतत नहर फुटण्याच्या घटना त्यामध्ये शेतकऱ्यांचे होणारे लाखोंचे नुकसान व तलावाचा पाणी व्यर्थ जाण्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झालीय.


           सोबतच आता तलावाच्या मुख्य पाळीला पडलेल्या भगदाडामुळे तर या सिंचन विभागाचा बोगस आणि निष्काळजीपणाचे पितळ जनतेसमोर उघडकीस आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निदर्शनास आलेला हा छोटासा असलेला हा भगदाड थातूरमातूर एका बाजूला मातीचे बोरे लावून, परिसरातील लाखो लोकांचे व शेतकऱ्यांचे जीव धोक्यात घालून धोक्यात घालून नंतर दुर्लक्षित करण्यात आला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावाच्या खाली बोकडोह नदीच्या काठावर असलेले शेतकर्याच्या शेती व परिसरातील गावातील लाखो लोकांचे जीव हे विभागाच्या निष्काळजीपणा मुळे धोक्यात आलेले आहे.
           एकीकडे शेतकऱ्यांची दैनाअवस्था, तलावाच्या पाळीला पडलेला धोकादायक भगदाड,  तर दुसरीकडे वारंवार नहर फुटत असल्याने सिंचनाचा निर्माण होत असलेला प्रश्न, व त्यात शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे या तलावा त प्रसिद्धीमुळे येऊन लाखो पर्यटकांचा धुमाकूळ, वन परिसरात होणारे प्रदुषण, आणि पर्यटकांचे तलावात दरवर्षी डुबून मरणे. तसेचश दुसरीकडे पाहता तलावाच्या सभोवतालील मोठमोठ्या गावांकरिता या तलावातून पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणारा पाणी, काही मोजक्या लोकांसाठी या तलावात मोठमोठाले प्रोजेक्ट राबवून त्यांना मत्स्य उत्पादनाची भरभराटीच्या साधन उपलब्ध होत असताना मात्र शासन किंवा संबंधित विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की काय..? हा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना निर्माण होणे सहाजिकच आहे.    
               कारण परिसरातील शेतकरी व सुशिक्षित जिम्मेदार लोक हे अधिकाऱ्यांना वारंवार धोक्याची सूचना करतात मात्र त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. या तलावाच्या पाळीवरून जड वाहतुकीस अडथळा निर्माण करावा असे सुचवले असताना. ऊलट हे अधिकारी आम्ही कुठून जाऊ हा प्रश्न निर्माण करीत संबंधित एका अधिकाऱ्याने ही पाळीवरून अवजड वाहनांना येण्या जाण्यास मोकळीक ठेवली होती . त्यामुळे सुद्धा या मुख्य पाळीच्या सुरक्षेला धोका हेच अधिकारी निर्माण करतात. 
            आता प्रत्येक शेतकरी प्रश्न निर्माण करू लागला आहे की, या घोडाझरी तलावाच्या देखभालिकरीता व नहराच्या रखरकाव करिता येणारा निधी नेमका कुठे मुरत आहे ? की विभागाला शासन पैसाच पुरवित नाही आहे..? ज्यामुळे वर्षाच्या वर्षाला वारंवार घोडाझरी नहर फुटणे, व आता तर तलावाची मुख्य पाळच फुटण्याच्या स्थितीत येणे. समोरील भविष्याची ही तर परिसरासाठी धोक्याची घंटा आहे.  जर ऐन पावसाळ्यात तलाव लबालक भरला असताना जर ही पाठ फुटली असती तर लाखो लोक मृत्यूमुखी पडले असते त्याला जिम्मेदार कोण असता.? या संपूर्ण घटनांच्या संदर्भात योग्य चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लोकांनाच्या जीवनाला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
  कोट:-
          " या तलावाच्या मुख्य पाळीने जड वाहतूक बंद करावी व पावसाळ्यापूर्वी लहान दिसत असलेला हा भगदाड याची मरंमत करावी अशी वारंवार मागणी करूनही याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी परिसरातील लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे त्यामुळे यांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे."
             -निकेश रामटेके ,सामाजिक कार्यकर्ते.
             "घोडाझरी तलावाच्या कालव्यांची अवस्था आज मोठी बिकट आहे.
आणि कालवें तुटने,फुटने,खचने ही परिस्थिती दरवर्षीच उद्भवत असते.आणि शेतकऱ्यांची मोठी नुकसान होत असते.यावेळी सुद्धा सदर ठिकाणी छोटा छिद्र पडलेला होता.तो मोठा होऊन कालवा फुटू शकते. ही बाब सरपंच या नात्याने depty साहेब कापसे यांच्या लक्षात आणून दिली होती मात्र सदर अधिकारी यांनी दुर्लक्ष करण्यात आले व नंतर कालवा त्याच जागेवर फुटला. अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संबंधात गंभीर नाही."
      - अमोल व्हि.बावनकर
       लोकनियुक्त सरपंच
     गट ग्रामपंचायत,येनोली माल
      ता.नागभीड
      "जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक 25 .1. 2023 ला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी नहर दुरुस्ती व सिमेंट काँक्रीटच्या बांधकामा करिता प्रस्ताव सादर केलेला आहे"
       - त्रिलोक कापसे, उपविभागीय अधिकारी, सिंचन विभाग सिंदेवाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]