सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर खुलासा करण्यास असमर्थ


फलका वरून भष्ठाचार किती होतो सामाण्य जनतेला माहितच होत नाही

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालुक्यातील विविध ठिकानी झालेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची फलके लावण्यात येतात परंतु त्यामध्ये कामाची अंदाजित किंमत, कामावर झालेला खर्च व कंत्राटदारा चे नाव रेखाटले जात नाही यास भ्रष्टाचार म्हणावे कि  विकासाची कामे असा ? जनतेला पडला आहे. हि संपूर्ण कामे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याने कुठल्याही अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.आणि हे असेच सुरु राहिले तर जनतेच्या श्रमाचा पैसा योग्य प्रकारे नियमानुसार न वापरता फक्त खिसे भरण्यासाठी वापरल्या जात राहिल अशी जनतेमध्ये चर्चा रंगली आहे.काम पूर्ण झाले असले तरी रस्त्याच्या कडेला दुतर्फा मुरुम सुद्धा टाकण्यात आले नाही. अभियंता तसेच कंत्राटदार यांच्या या बोगस कामामुळे भविष्यात जनतेला याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]