नवभारत विद्यालय मूलच्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हस्ते गौरव

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव


मेरी माटी मेरा देश अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत मुल येथील नवभारत विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
आज दि.22/10/2023 ला " मेरी माटि मेरा देश" अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,चंद्रपूर यांच्या सौजन्याने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत नवभारत विद्यालय मुल येथील कु.कामेश्वरी आशिष गुंडोजवार हिने तृतीय क्रमांक ,कु.नंदिनी रेवणाथ वालदे हिने वक्तृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक, कु.सलोनी भिमदर्शन डोहने हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्यांचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व पर्यावरण मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित केले. विद्यालयाच्या वतीने खुप खुप अभिनंदन.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अशोक झाडे यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]