रस्त्याच्या मागणीसाठी नगर परिषदेला जनतेनी घातला घेराव

नगर परिषद चिमूर ची घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर नगर परिषद क्षेत्रात येत असलेल्या कवडशी याठिकाणी जाण्यासाठी एकमेव जुना मार्ग म्हणजे उमा नदी पात्र होता. परंतु आज त्या उमा नदी पात्राची अवस्था बघितली कि रेती माफियांनी ती नदी पोखरून मोठ - मोठे खड्डे तयार केली.यामुळे विद्यार्थी तसेच जनतेला ३ कि.मी.अंतराचा वेढा घालून चिमूर याठिकाणी शिक्षण तसेच इतर कामासाठी दैनंदिन ये - जा करावे लागते.याबाबत अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या असून याकडे चिमूर नगर परिषदेचे वारंवार दुर्लक्ष होतांना दिसत आहे.असे वारंवार होऊ नये आमची मागणी पूर्ण व्हावी यासाठी सकाळी ९ वाजेपासून नगर परिषदेच्या दारात विद्यार्थी व जनतेनी ठिय्या आनोदल केले. जाण्यासाठी चा मार्ग तयार करून पथदिव्यांची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी या कवडशी वासीय जनतेची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]