नवरात्रीःःआदीशक्ती दुर्गा देवीचा जागर
   !!सर्व मंगल मांगल्ये ,शिवे सर्वाथ साधीके ,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते !!
    आदिशक्ती जगतजननी श्री दुर्गादेवीची आपण या नऊ दिवसात जास्तीत जास्त उपासना करतो. तिची उपासना करुन आपल्याला तिची शक्ती आपल्या अंगी बाणवायची असते. तिची उपासना आपण भजन,कीर्तन, आरत्या किंवा तिचे सप्तशती पाठ या सर्व माध्यमातून आपण करतो. यासोबतच आपण तिचा जास्तीत जास्त नामजप पण करू शकतो .मग कोणता नामजप आपण करु शकतो तर !!श्री दुर्गादैव्ये नमः!!
या नऊ दिवसात जर आपण हा नामजप जास्तीत जास्त केला तर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व समाजातील दुष्ट शक्तीविरूद्ध लढण्याची शक्ती पण देवी आपल्याला देईल. कारण कलीयुगात नामसाधनेलाच जास्त महत्व आहे.
      छत्रपती शिवाजी महाराजांनी पण भवानी देवीची उपासना करून तिचा आशीर्वाद मिळवला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या मुखात नेहमी देवीचे नाम असायचे.
  रामकृष्ण परमहंस हे सुद्धा माँ कालीची उपासना करत होते माँ काली तर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देत होती.त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदाना  पण त्यांनी साक्षात्कार घडवुन दिला आणि स्वामी विवेकानंद त्यांच्या कर्तृत्वाने जगभर प्रसीद्ध झाले.
   स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा आपल्या कुलदेवतेची आराधना करत होते व त्यांना ईंग्रजांविरूद्ध आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी शक्ती मिळाली असे अनेक उदाहरण आपल्याला देता येईल.
   परंतु आता या नवरात्रोत्सवाला नवीनच रुप देण्यात आले आहे. नवरात्र म्हणजे एक मनोरंजन झाले आहे. गरबाच्या नावाखाली मुले मुली एकत्र येऊन विभित्स प्रकार सुरु झाले आहेत आणि याचाच फायदा ईतर धर्मीय लोक घेत आहे. आपल्या हिंदुना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदु  त्याला बळी पडत आहेत. खरं तर गरबा म्हणजे विशिष्ट प्रकारच्या लयीत नृत्य करुन देवीला जागे करुन तिच्या मारक शक्तीला ब्रह्मांडात आवाहन करायचे असते. परंतु आपल्या हिंदुना‌ धर्मशिक्षण नसल्यामुळे गरबा म्हणजे एक मनोरंजनात्मक कार्यक्रम अशी त्यांची धारणा झाली आहे.लहान मुलांवर सुद्धा तसेच संस्कार झाले आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या उपासनेचे दिवस तिची उपासना करुन आपल्याला दुर्जनांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळवायची आहे.
    पहिले तीन दिवस तमोगुण वाढवणारी महाकाली ची उपासना, दुसरे तीन दिवस सुखसमृद्धी देणारी महालक्ष्मीची उपासना तर तीसरे तीन दिवस विद्या,बुद्धी देणाऱ्या महासरस्वतीची उपासना 
     चला तर आपण या नऊ दिवसात जगतजननी आदिशक्ती दुर्गादेवीचा जागर करून तिचा आशीर्वाद मिळवु या.
    !!या देवी सर्व भुतेषु शक्तीरूपेण संस्थीता ,
    नमोस्तस्यै नमोस्तस्यै नमोस्तस्यै
नमो नमः!!
      सौ.भारती जीवन कोंतमवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]