नवभारत कन्या विद्यालयात वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादनस्थानिक नवभारत कन्या विद्यालय मुल येथे आज शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, विद्यालयातील जेष्ठ शिक्षक, शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांनी हस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, जेष्ठ शिक्षक विजय सिध्दावार, मिलींद रामटेके, सौ. अर्चना बेलसरे यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ शिक्षिका उज्वला चहांदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल निमगडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]