नवभारत कन्या विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीची विभागीय स्पर्धेकरिता निवडनवभारत कन्या विद्यालय मुल येथील विद्यार्थिनी कु. संजना अजय सोयाम व कु. निकिता रोहनकर या दोन विद्यार्थिनीची कबड्डी स्पर्धेकरिता विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.
शालेय क्रीडा स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालय मुलीची चमू तालुक्यात पहिली आली. या टीमने जिल्हास्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. या टीममधील संजना अजय सोयाम व निकिता रोहनकर यांचा खेळ अव्वल झाल्याने, निवड समितीने या दोघींची निवड विभागीय टीम मध्ये करण्यात केली. संजना आणि निकिताची निवड ही मूलवासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांनी व्यक्त केले.
संजना आणि निकिता हिला क्रीडाशिक्षक दिनेश जिद्दीवार यांचे मार्गदर्शन लाभले. संजना आणि निकिताचे नवभारत कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]