शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा अभिनव उपक्रम
मुल - एक ओटी शैक्षणिक साहित्याची या उपक्रमाअंतर्गत नवरात्र महोत्सव  मुल येथील महिलांना आवाहन करून संकलित झालेले शैक्षणिक साहित्य आणि श्री. बंदुभाऊ साकलवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधी चौक मुल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहीरगाव,मुल येथे जाऊन वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, कविता मोहुर्ले नागपूर विभाग सचिव, गुरु  गुरनुले ज्येष्ठ पत्रकार व नागपूर विभाग जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख, अल्का राजमलवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा, कुमुदिनी भोयर मुल तालुका युवती अध्यक्षा, शशिकला गावतुरे मुल तालुका संघटिका, नंदा शेंडे तालुका संघटिका, कल्पना मेश्राम तालुका संघटिका, सुनिता खोब्रागडे तालुका संघटिका, वंदना वाकडे मुल शहर संघटीका, सपना निमगडे शहर संघटीका,साईमित्र परिवारचे  मुख्य संयोजक विवेक मुत्यालवार, बंडुभाऊ साकलवार,दुर्गा मंदिर प्रतिष्ठानचे मुकेश महाराज, विस्वस्थ केदारनाथ कोटगले ,संचालक मंडळ, शारदा महिला मंडळ चे निंबेकर मॅडम उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधी चौक मुल येथील शिक्षिका बुरांडे मॅडम, रामटेके सर, इतर शिक्षकवृंद आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहीरगावच्या गावतुरे मॅडम यांनी सहकार्य केले.शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन्सिल,खोड रबर,शापणर, वही पेन साहित्य मिळाल्याने सर्व विद्यार्थीनी आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]