शासकीय नौकऱ्याच्या कंत्राटीकरण व सरकारी शाळांच्या खाजगी करणाविरोधात बल्लारपुरात भव्य धरणे आंदोलनबल्लारपूर :- (धनंजय पांढरे )भारतीय घटनेने दिन दलित शोषित पीडित समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या घटकांना दिले तसेच प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधीकार म्हणून शिक्षणाचा अधिकार बहाल केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले मात्र महाराष्ट्र सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी तत्वावर नौकर भरती व 18 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 62,000 शाळाचे खाजगीकरण करण्याचे शासन परिपत्रक काढले जे पूर्णतः चुकीचे आहे यासोबतच राज्य शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या नौकर भर्ती चे परिक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशा अनेक विविध प्रकारच्या मागण्यासाठी लोककल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुका व समर्थन देणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक संघटना तालुका बल्लारपूरच्या वतीने शासकीय नौकऱ्याच्या कंत्राटीकरण व सरकारी शाळांच्या खाजगी करणाविरोधात बल्लारपुरात भव्य एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन 13 ऑक्टोम्बर 2023 ला दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत असून बल्लारपुरातील नगर परिषद चौक परिसरात आंदोलन होणार आहे व त्यानंतर मा. उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री सह प्रशासनाला मागण्याचे  निवेदन सादर करण्यात येणार आहे. तरी या भव्य जन आक्रोश धरणे आंदोलनाला नौकरदार वर्ग विद्यार्थीसह त्यांच्या पालकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन लोककल्याणकारी संघर्ष समिती बल्लारपूर तालुका व समर्थन देणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक संघटना तालुका बल्लारपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]