अंधाराची कुरकुर करण्यापेक्षा दिवे पाजळा"....रवींद्र तिराणिक ग्रामीण विद्यार्थी - संवादातील मान्यवरांचा सूर...
वरोरा.. जगदीश पेंदाम

ग्रामीण गोरगरिबांची, शेतकऱ्यांची ,आदिवासींची मुले रानावनात काबाड कष्ट करतात, पण अजूनही या लोकांच्या जीवनात प्रकाश दिसत नाही. या लोकांच्या जीवनाला आकार नाही या लोकांच्या जीवनाला आकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी "अंधाराची कुरकुर करण्यापेक्षा दिवे पाजळा " हा दृष्टिकोन बाळगून आम्ही वाटचाल करणार आहोत असे स्पष्ट मत या शेतकऱ्यांच्या मुलानंशी ग्रामीण-  विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन संवाद कार्यक्रमात मुख्य संयोजक सामाजिक कार्यकर्ते, जनमंच सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले.

 चिरादेवी येथे मी आय. ए. एस. अधिकारी होणारचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संवाद शेतकऱ्यांच्या मुलांशी कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिरादेवी ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात भर  पावसात, रिमझिम पावसाचा वर्षाव सुरू असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता ग्रामस्थांनाकडून इतरांच्या डोळ्यात भरेल असा आगळा वेगळा अनुभव देत थाटात विविध स्तरावरील तज्ञ मार्गदर्शक वक्ते पाहुण्यांचे गावाच्या आगमन गेटवर औक्षवंन करीत स्वागत केले हे या संवाद कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.
भद्रावती - तालुक्यातील चिरादेवी हे गाव नेहमीचं चर्चेचा विषय बनलेला असतो. नुकत्याच पार पडलेल्या मी आय. ए. एस अधिकारी होणारचं! हा कार्यक्रम चिरादेवी येथे आयोजित करण्यात आला होता. भर पावसात समस्त ग्रामस्थांनी आय. ए. एस मिशनचे डॉ. नरेशचंद्र   काठोळे ,चंद्रपूर ,यवतमाळ, वर्धा मुख्य संयोजक जनमंच सदस्य महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे रवींद्र तिरानिक, कीटक शास्त्रज्ञ , कृषी तज्ञ, सल्लागार मिलिंद राऊत नागपूर, से.नि.सहाय्यक संचालक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग,नागपूर मिलिंद हांडे , से.नि. निर्देशक शासकीय तांत्रिक विभाग, नागपूर सुनील भुसे, विद्यापीठ संगीत विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंद्रकिरण घाटे आदीप्रमुख पाहुण्यांचे मोठ्या उत्साहाने ग्रामीण शैलीत स्वागत केले. यामध्ये लेझीम, आदिवासी नृत्य चंद्रपूर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा या जिल्ह्यांना सिहांचा वाटा आहे. म्हणून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची वेशभूषा साकारण्यात आली.रस्त्याच्या कडेला रांगोळी एवढेचं नाही तर जणू काही एखादी सणचं अशाप्रकारे प्रत्येकांनी आपल्या घरासमोरील रस्ता - परिसर स्वच्छ करून घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या. रस्त्याने सुस्वागतम - सुस्वागतम असे मोठ्या अक्षरात लिहून भर पावसात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. लेझीम च्या माध्यमातून पाहुण्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यात आले. 
 कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षण क्षेत्रात क्रांति घडवून आणणारे, स्त्री हि " चूल आणि मूलं " यातचं मर्यादित न राहता पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावून देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा अधिकार देणारे क्रांतिकारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले, स्वराज्य रक्षक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालारपण केले. स्वागत गीतांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. 
 सामान्य शेतकऱ्यांचा पोरगा ही आयएएस ,आयपीएस बनू शकतो. शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण कलेक्टर होत आहेत. यांची अनेक मार्मिक उदाहरणे या कार्यक्रमात मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रसंगी या गावातील दरवर्षी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, कठीण परिस्थितींना सामना देत शासकीय नोकरीत नियुक्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला.

"धरती को स्वर्ग बनाना मेरा मक्सद नही बस रोहके चार काँटे हटा संका तो जिंदगी सफल हो जाए"... 
  तसंच जितकं होतं तितकं तरी आपण प्रयत्न करायचा आणि जगा वेगळं व्हायचं. हा येणाऱ्या युवा पिढीला या संवाद कार्यक्रमातून संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रविंद्र तिरानिक (जनमंच सदस्य नागपूर व महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अ. भा. ग्रा. पत्रकार संघ ) यांच्या नेतृत्वाखाली आयोजक सौरभ चामाटे, सर्व ग्रामस्थ, युथ टीम, संजीवनी महिला ग्रामंसंघ, शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मुसळे व प्रास्ताविक सौरभ चामाटे यांनी केले. अध्यक्षस्थानी सौ. निरूपला मेश्राम ( सरपंच ),  मुख्य मार्गदर्शक आय. ए. एस. मिशन चे संचालक  डॉ नरेशचंद्र काठोळे, प्रमुख मार्गदर्शक अतिथी  मिलिंद राऊत किटक शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ व सल्लागार IBN lokmat, Sam TV, TV 9, zee24 ई. वृत्तवाहिनी प्रसारण , मिलिंद हांडे से. नि. सहायक संचालक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग नागपूर , सुनील भुसे से. नि. निदेशक शासकीय तांत्रिक विभाग, नागपूर, प्रा. डॉ. चंद्रकिरन घाटे, राजेश वाघदरकर मुख्याध्यापक जि, प. उच्च प्राथ. शाळा चिरादेवी , समीर आसुटकर अभियंता ,प्रा.भूषण वैद्य, सचिन महाजन ,पोलीस पाटील मा. बंडू जोगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता रात्री दहा वाजता डॉ.प्रा. चंद्रकिरण घाटे संगीत विभाग प्रमुख यांनी पसायदाननी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ व युथ ग्रुप यांनी अथक परिश्रम केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गीताताई उपरे यांनी केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]