नवभारत कन्या विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजराभारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष यांचा जन्मदिवस आज नवभारत कन्या विद्यालय मुल येथे राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार यांनी सरदार पटेल यांच्यामुळे देशात एकता आणि अखंडता निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे, ज्येष्ठ शिक्षक दिनेश जिद्दीवार, मिलिंद रामटेके यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी समीक्षा रामटेके तिनेही यावेळी आपले विचार व्यक्त केले. वैष्णवी चटारे हिने गीत सादर केले.
ज्येष्ठ शिक्षक विजय सिद्धावार यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका तृप्ती रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका मंजुषा पंधरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]