१४ मार्च २०२३ या तारखेला काढलेला सेवा पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय रद्द करावे - डॉ. सतिश वारजूकर

शासन निर्णयाची पेटूवून होळी करण्यात आली

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी )

चिमूर : - गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहात.अस्मानी आणि शासकीय संकटाला सामोरे जाणारा शेतकरी बाप आधीच अडचणीत असताना दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी देखील वरील निर्णयाच्यामुळे काढून घेत आहेत. हा जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. कदाचित ही नाराजी रस्त्यावर आल्यास महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
    त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या पदभरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरावे. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज व कांग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील.असे आव्हान ७४ चिमूर विधानसभा समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी सरकार केले. व आजपासून तालुका कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या तर्फे नंबर (१) शासकीय सेवेत कंत्राटी भरतीच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावे.(२) राज्यातील ६२ हजार जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचे धोरण रद्द करण्यात यावे.(३) २० च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये.ह्या तीन प्रमुख मागण्या घेऊन साखळी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवादल महासचिव प्रा. राम राऊत सर, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील, गजानन भाऊ बुटके,शहर अध्यक्ष अविनाश अगडे, सेवादल तालुका अध्यक्ष किशोरजी सिंगरे,ओबीसी विभाग अध्यक्ष विलास डांगे,किसान सेल तालुका अध्यक्ष राजूभाऊ कापसे,अध्यक्ष अनुसूचित जाती ,अध्यक्ष अनुसूचित जमाती बालाजी कोयचाडे,महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस साईश वारजूकर, विधानसभा युवक अध्यक्ष रोशन ढोक,युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे,तालुका सचिव विजय डाबरे, माजी अध्यक्ष संजय घुटके,उपाध्यक्ष विनोद ढाकूणकर, उपाध्यक्ष राजूभाऊ चौधरी,संदीप सातव,राजू दांडेकर,मीडिया प्रमुख पप्पू शेख,बबन कुबडे, जावाभाई,सुभाष बन्सोड, प्रमोद दाबेकर,भाऊ टेकाम,कमलसिंग अंधरीले,वरखडे काकाजी, अमोल जूनघरे,अक्षय नागरिकर श्रीकांत गेडाम,सुधीर भोयर,जिल्हा उपाध्यक्ष महिला कांग्रेस सविताताई चौधरी,तालुका कांग्रेस महिला अध्यक्ष वनिता मगरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गिता रानडे माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर,तालुका उपाध्यक्ष माधुरीताई रेवतकर, प्रज्वला गावंडे,दिक्षा भगत,कल्पना इंदूरकर,सुरेखाताई सेंबेकर,व संपूर्ण कांग्रेस पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]