लाच घेतांना रजिस्ट्रार अटकेत - मुल येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार

 


मूल :-  मुल येथील श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी  दुय्यम निबंधक हिने दहा हजार रुपये लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली. .         प्रकरणातील  तक्रारदार हे मौजा मारोडा, ता. मुल, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन दस्तलेखनाचे काम करतो. तकारदार यांचेकडे त्यांचे पक्षकार यांची मौजा मुल येथील शेत जमिन फेरफार करायची होती. त्यांकरीता दिनांक ११/१०/२०२३ रोजी तक्रारकर्ते हे पक्षकाराचे मौजा मुल येथील शेती संबंधी दस्त नोंदणीचे कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय, मुल येथील गै.अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुय्यम निबंधक यांचेकडे जाऊन दस्त तपासणी व शेत जमिनीचे मुल्यांकन काढुन दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता दुय्यम निबंधक श्रीमती मिटकरी मॅडम यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरीता गैरअर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरीक्त १५,०००/- रूपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.

प्राप्त तकारीवरून आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील यानी तकारदाराने दिलेल्या तकारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी / सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी कार्यवाहीदरम्यान गै.अ. श्रीमती वैशाली मिटकरी दुयम निबंधक यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याचे कामाकरीता तडजोडीअंती १०,०००/- रू लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दुयम निबंधक कार्यालय मुल येथे पंचासमक्ष कार्यवाहीदरम्यान आ.लो.से. श्रीमती वैशाली वैजनाथ मिटकरी, मुल्यांकन दुय्यम निबंधक यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]