नगर परिषद चिमुर अंतर्गत जनतेच्या आवश्यक गरजा तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू - डॉ.सतिश वारजूकर

चिमुर नगर परिषद क्षेत्रात जनतेच्या अनेक समस्या असून जनता हवालदिल झाली आहे

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : -  चिमूर नगर परिषद प्रशासन क्षेत्रातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यात असमर्थ झाल्याने चित्र स्पस्ट झाले आहे. तेव्हा समस्या लक्षात घेऊन अवाढव्य घर टॅक्स, कायमस्वरूपी पट्टे, नियम बाह्य पद्धतीने खोदकाम करणे, जवाहर विहिरीचे लाभार्थी यांचे पैसे अदा करणे, मंजूर घरकुल कामाचे पैसे जमा करणे,निकृष्ट दर्जाचे कामाचे देयके चौकशी करून देण्यात यावे, कामाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, पाणी पुरवठा व्यवस्थित करावा, समाज कल्याण योजना राबविण्यात यावी, सेतकऱ्यांना कृषी योजनेचा लाभ देण्यात यावा,आठवडी बाजाराची व्यवस्था करणे,विद्युतीकरण भूमिगत करणे, बालउद्यान तयार करणे, आखीव पत्रिकेची अट रद्द करून नवीन घरकुल मंजूर करावे,व स्थानिक गरजा लक्षात घेऊन आपण आपले स्तरावर तात्काळ प्रयत्न करून सोडवाव्या अन्यथा चिमुर तालुका कांग्रेस कमेटी शहर कॉग्रेस कमेटीने आज निवेदन दिल्यापासून एक महिन्याच्या आत आवश्यक त्या गरजा पूर्ण कराव्यात अन्यथा नगर पालिका कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा ७४ - चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजूकर यांनी केली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस, माजी जि.प. सदस्य गजाजन बुटके, शहर अध्यक्ष अविनाश अगडे तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी,संचालक बाजार समिती भरत बंडे,माजी सरपंच बाळू बोबाटे, मीडिया प्रमुख पप्पू शेख, देविदास मोहिनकर , जावा भाई,गजानन घनोडे, भगवान गुरनुले, तेजराम झाडे, रामदास थुटे,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]