दोन आरोपीना पोलीसांनी मुद्देमाला सह केली अटक

जांभुळघाट येथील जि.प.शाळेमध्ये झाली चोरी

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक. ०२/१०/२०२३ ला सोमवार च्या रात्रिच्या अंधाराचा फायदा घेत चोरी झाल्याने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची झोप उडाली आहे.शाळेच्या मांगच्या खिडक्की ची सळाख मोडून आरोपी आत गेले.व विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या प्लेटा अंदाजे ४७ नग आरोपीने चोरी करून नेली.या सर्व प्रकरणाची मुख्या ध्यापकांनी भिसी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलीसांनी वेळ न गमवता तात्काळ याबाबत ची चौकशी करून २४ तासाच्या आत आरोपी सुरज चंदन बावणे वय अंदाजे २२ वर्ष व कार्तीक सब्बा गेडाम वय अंदाजे ४५ वर्ष रा.जांभुळघाट ता.चिमुर जि.चंद्रपुर, ५५०० रूपये च्या मुद्देमालासह दोन्ही आरोपीना दिनांक. ०४/१०/२०२३ ला कलम,३८०, ४५७,३४ भा.द 'वी' अंर्तगत अटक करण्यात आली.सुरज बावणे हा नियमित छोट्या-मोठ्या चोरी करीत असल्याने जांभुळघाट च्या दुकाणदारा मध्ये भित्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोरील तपास भिसी पोलीस स्टेशन चे ठाणेदार पि.आय.राऊत यांच्या नेतृत्वात बिट जमादार अमोल नवघरे व त्यांचे पथक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]