राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रपुर युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी सुमीत सुरेशराव समर्थ यांची नियुक्ती

            आज दिनांक  11 ऑक्टोबर 2023  रोजी बुधवारला  मुलचे  राष्ट्रवादी काँग्रेस चे निष्ठावंत युवा नेते श्री सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांची  मुंबई येथील  यशवंतराव चव्हाण केंद्र येथे चंद्रपुर जिल्हा युवक अध्यक्ष( ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष  ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन  नियुक्ती करण्यात आली  ! सदर नियुक्ती  सुमीत समर्थ ह्यांचा कार्याची  दखल घेत  विविध  आंदोलन , पक्ष संगठन व तसेच पक्ष स्थापने पासून निष्ठेने पक्षात काम  करणे  , ह्या बाबीचा  विचार करून  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मान. जयंत पाटील साहेब तसेच  राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे  प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख ह्यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती वेळेस राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य , महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके , चंद्रपुर शहर अध्यक्ष दीपकबाबू जयस्वाल ,  नागपूर महिला जिल्हाध्यक्ष जयाताई देशमुख , युवक चे जिल्हा कार्याध्यक्ष  संजय ठाकूर उपस्थित होते !  सदर नियुक्ति वेळेस सुमीत समर्थ ह्यांनी चंद्रपुर जिल्ह्यात युवकाची  फळी तयार करून  जिल्ह्यात पक्ष मजबूत करून  आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात मजबूत करू असे  नियुक्ती वेळेस  प्रतिपादन केले !  संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे  व सर्व सेलचे पदाधिकारी  ह्यांनी नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]