चार वर्षाच्या चिमुकलीला भजी खाण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि अत्याचार करून आरोपी फरार

पोलीसानी शोध मोहीम राबोऊन आरोपी गोैतम खोब्रागडे ला पास्को अंतर्गत अटक 

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमूर तालुक्यातील दाबकाहेटी येथील चार वर्षाच्या बालिकेवर एका 34 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल रविवारी उघडकीस आली. पोलीसांनी आरोपी अमोल गौतम खोब्रागडे याला अटक केली आहे.

चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाणे अंतर्गत दाबकाहेटी येथील साडेचार वर्षाची बालिका काल रविवारी आपल्या मैत्रिणीच्या घरी खेळत होती. त्या मैत्रिणीच्या घराजवळ आरोपीचे घर आहे. आरोपीने त्या चिमुकलीला भजी खाण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले. आणि अत्याचार केला.

बालिका घाबरून रडत रडत आपल्या घरी आली. तिने आपल्या आजीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आई-वडील शेतावर गेलेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. सदर घटनेची तक्रार भिसी पोलीस ठाणे येथे केल्यानंतर आरोपी विरोधात अ.प.क्र. 233/23 कलम 376, 376(2)(J), 376(AB), R/W 4, 8, 12 पोक्सो अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला.या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.आज पहाटे पोलीसांनी आरोपी अमोल गौतम खोब्रागडे याला अटक केली असून बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]