त्या गजराजाचा मृत्यू

त्या गजराजाचे मृत्यू


सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)

सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार कच्चेपार गावात काही दिवसा आधी जंगल परीसरावाटे दाखल झालेल्या नर हतीचा मृत्यू सिंदेवाही तालुक्यातील चिटकी परिसरात झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार परीसरात एक हत्ति दाखल झाला होता .हा हत्ती ओडीसा राज्यातून नर हत्ती गडचीरोली च्या जंगल मार्ग वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी नंतर सावली नागभीड मार्गे आला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला होता.तो नर जातीचा हत्ती मागिल काही दिवसापासून  सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात  होता . मध्यतंरीच्या काळात तो ब्रम्हपुरी जंगल क्षैत्रात आढळला असल्याची चर्चा नागरीकात असतांनाच
अचानक दोन दिवसापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील जंगलात दाखल झाला तो  नर हत्ती जाटलापूर मार्गे चिटकी या गावात रात्री आला असावा असा अंदाज गावकरी व्यक्त करीत आहे. सदर 
 हतीचा चा मृत्यू तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील मुरपार बिटात चिटकी जंगलात दोन विभागाच्या सिमेत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे 
.
या अगोदर सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या गावात मागील दोन ते तीन दिवसांपासून हत्तीने शेतशिवारात थैमान घातले होते . यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. 

 रात्रीच्या सुमारास जंगललगत असलेल्या 20 शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले होते . त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. या हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांब सुद्धा पाडला होता. लोन खैरी गोविंदपुर चिटकी मुरपार गावातील शेतातून हत्ती पिके तुडवित असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते .
त्यानंतर अचानक नर हतीचा मृत्यू झाल्याचे कळताच" वनविभागात एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी जागेवर दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत. सदर मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे गुलदस्त्यात असुन  नर हतीचा मृत्यू चा कशाने झाला हे आवाहन वनविभागासमोर आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]