सादागड, सादागड हेटी ही गावे सावली तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

सावली - सावली तालुक्यात असलेली सादागड व सादागड हेटी ही गावे मुल तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये  समाविष्ट असल्याने ही गावे सावली तालुक्यातील चारगांव ग्रामपंचायतला समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
      मूल तालुक्यातील टेकाडी ग्रामपंचायत अंतर्गत सादागड, सादागड हेटी ही गावे अंतर्भूत असून ग्रामपंचायत कार्यालय मूल तालुक्यात असताना महसूली गावे मात्र सावली तालुक्यात आहेत.  ही दोन्ही गावे संपूर्ण आदिवासी लोकवस्तीची आहेत.  शेती ही सावली तालुक्यातील खेडी तलाठी साज्यात आहे. या गावातील सर्व व्यवहार हे सावली तालुका मुख्यालयातून होत असतात. घरकुलची कामे, पाणी पुरवठा योजनेची कामे सावली पंचायत समितीमधून होतात मात्र ग्रामपंचायत मूल तालुक्यातील टेकाडी ही आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने गावकऱ्यांना अडचणी येत आहेत. म्हणून ही गावे चारगांव ग्रामपंचायतिमध्ये समाविष्ट करण्याची मागणी तहसीलदार व संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे गावाकऱ्यांनी केली. सोबतच जिल्हा परिषद शाळा बंद न करण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविले. रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार सेवकाची निवड करून कामे सुरु करण्याची मागणीही पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात केली. यावेळी शरद मडावी, प्रकाश मंगाम,श्रीकांत बहिरवार, अरुण गेडाम, साईनाथ मडावी, प्रभाकर सिडाम, अस्मिता मंगाम, चंदू गेडाम, दिवाकर गावडे, धनराज मडावी, नितीन सिडाम, अनिल कुळमेथे, शांताराम परचाके आदी शेकडो गावकरी उपस्थित होते.
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]