टाटा सामाजिक विज्ञान संस्था व तहसील कार्यालय तर्फे सामूहिक वन हक्क कार्यशाळेचे आयोजनटाटा सामाजिक विज्ञान संस्था व तहसील कार्यालय मुल तर्फे सामूहिक वन हक्क कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपुर व मुल तालुक्यातील वन हक्क कायदा २००६ अंतर्गत प्राप्त २५ सामूहिक वन हक्क गावांसाठी तहसील कार्यालय, मुल येथे तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक १०.१०.२०२३ रोजी करण्यात आले. सदर कार्यशाळेत वन हक्क कायदा, ग्रामसभा सशक्तीकरण, ग्रामसभा महासंघ, वन हक्क क्षेत्रात नरेगाची कामे, सीमांकन व्यवस्थापन आराखडे नरेगा रोहयो यंत्रणा व सामूहिक वन हक्क त्याचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत काटवन, करवण, ताडभुज, मुरमाडी, फुलझरी, जनाळा, कांतापेठ, आगडी, दाबगाव, सुशी, नागाळा, महादवाडी, चीचपल्ली, नंदगुर, वायगाव, डोणी, पेठ,चोरगाव, वरवट इ. गावातील व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. हे प्रशिक्षण विशालकुमार मेश्राम उपविभागीय अधिकारी, डॉ.रवींद्र होळी तहसीलदार मुल, स्नेहा ददगल जिल्हा व्यवस्थापक, बी. एस. वकेवार वनपाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाल असून कार्यशाळेला, तालुका व्यवस्थापक वनहक्क रजनी घुगरे व वैष्णवी चवधरकर, तालुका कन्वर्जन समितीचे सदस्य सतीश नंदगीरवार, वासुदेव कुळमेथे, निखिल गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत व टाटा सामाजिक संस्थेच्या वतीने नितीन ठाकरे, प्रवेश सुटे ,सुकेशनी बागडे, उपविभागीय कार्यालय, पंचायत व तहसील कार्यालय मुल व चंद्रपुर कर्मचारी,सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने पार पडला कार्यक्रमाचे आभार वैष्णवी चवधरकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]