शासनाच्या आदेशास झुगारून पवनी शहरात रावण दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

विविध भागातून निघाली आखाडे

जण संदेश देणारी निघाली झाकी 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, भंडारा द्वारे आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळयाचे दस-याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्तीवर व मंडळावर गुन्हे दाखल करुन ही दहन प्रथा बंद करणेबाबत चा आदेश जाहीर करण्यात आला असताना सुद्धा या आदेशास झुगारून रावण दहनाची प्रथा भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात कायम ठेवण्यात आली. आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळयाचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्तीवर व मंडळावर गुन्हे दाखल करुन दहन प्रथा बंद करण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांना प्राप्त झाले असून दहन प्रथा बंद न झाल्यास अनुसुचित जनजाती समाजाच्या वतीने आक्रोष मोर्चा काढण्यात येणार असल्याबाबतचे संदर्भियं निवेदनात स्पष्ट नमूद केले असतांना सुद्धा रावण दहन प्रथा पवनी याठिकाणी कायम ठेवली गेली.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने शांततेत हा रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो.या दसरा कार्यक्रमात विविध प्रभागांमधून आखाडे व जण संदेश देणारी झाकी तयार करून शोभा यात्रा मिरवणूक चण्डिका मंदिर पर्यंत संगीताच्या तालावर काढण्यात आली.यावेळी रावण दहन कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनतेची उपस्थिती होती.चण्डिका देवस्थान याठिकाणी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या झाकींना बक्षीस वितरण करण्यात आली.संपूर्ण विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात या पवनी येथील दसरा प्रसिद्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]