खाजगी नोकर भरती व इतर निर्णयाविरोधात सावली येथे धरणे आंदोलन - शिक्षण व नोकरी बचाव समितीचा पुढाकार

सावली :- खाजगी कंपन्यामार्फत नोकर भरतीचा निर्णय घेतल्याने बेरोजगारांवर अन्याय होत असल्याने व इतर शिक्षण, शेतकरी यांच्याविरोधातील निर्णयाविरोधात आज सावली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे आयोजन 
 खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोध, शिक्षण व नोकरी बचाव समितीने केले होते.
       महाराष्ट्र सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी तत्वावर बाह्ययंत्रणेमार्फत नोकर भरती व 18 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील  62,000 शाळाचे खाजगीकरण करण्याचे शासन परिपत्रक काढले आहे जे प्राथमिक शिक्षण अधिकार विरोधी आहे, बाह्ययंत्रणेमार्फत नोकर भरती हे बेरोजगारांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा, शाळा खाजगीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, विस पटसंखेच्या शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांच्या धानाला जास्तीत जास्त हमी भाव द्यावे, बेरोजगारांना पाच हजार भत्ता द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, स्पर्धा परीक्षा फी शंभर रुपये ठेवावी या मागण्या घेऊन सावली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
   
  या आंदोलनात नगराध्यक्ष लताताई लाकडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुकद्दर मेश्राम, माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, नगरसेवक विजय मुत्यालवार, 
शिक्षक संघटना समन्वय समिती सावली निमंत्रक किशोर आनंदवार, संदेश मानकर , वामन चौधरी, सुधाकर चरडूके, जीवन भोयर , राजू कतलामि, आदेश मानकर , विजय मिटपल्लीवार , मंगला गोंगले, मालती सेमले, वंदना हनुवते, संगीता मानकर, नगरसेवक प्रफुल वाळके, साधना वाढई, ज्योती शिंदे, अंजली देवगडे, किशोर घोटेकर सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]