टाळ्यांचा गजरात केले महिलांनी देविचा विसर्जनतेजस्विनी शारदा महिला मंडळ गजानन महाराज मंदिर वार्ड नं 14 येथील महिला भगिनींनी केले टाळांच्या गजरात शारदादेवीचे विसर्जन.
नवरात्रीच्या दिवसांत नऊही दिवस ऊर्जा देवून जातात. या निमित्ताने महिला एकत्र येवून अनेक कार्यक्रम आयोजित करतात तद्वतच तेजस्विनी शारदा महिला मंडळ गजानन महाराज मंदिर येथील महिलांनी सौ. रत्नमाला भोयर, सौ. अर्चना चावरे, सौ. सुरेखा आक्केवार सौ. श्रद्धा कामडी यांच्या नेतृत्वात महिला व लहान मुलांची खेळ स्पर्धा घेण्यात आली,, रांगोळी स्पर्धा, चमचा गोळी, समयसुचक स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची,,, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले. आ.कोंतमवार काकू यांच्या वाढदिवसानिमित्य कोंतमवार परिवाराकडून बक्षिसे देण्यात आली. सौ, श्रद्धा कामडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमास श्रीमती कोंतमवार काकू, सौ. मंजूळाबाई कोरडे, सौ.सुमन चिताडे, श्रीमती एडलावार काकू, सौ. पटेल काकू, सौ. सुरमवार काकू, श्रीमती निर्मला भोयर यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. भारती कोंतमवार, सौ.सोनल श्रीगूरवार, सौ. विद्या जाजमवार, सौ. साधना रडके, सौ. सीमा लोनबले यांनी सहकार्य केले.
वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे देवी विसर्जना साठी डीजे लावले जातांना मात्र तेजस्विनी शारदा महिला मंडळ गजानन महाराज मंदिर नगरीतील भगिनींनी डीजे न लावता टाळ व ढोलाच्या गजरात देवीचे विसर्जन पर्यावरण संवर्धनाचे भान राखत केले ,आज घडीला हे कौतुकास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]