मूलच्या दोन तरूणाची भन्नाट कल्पना — राज्यातील हजारो युवकांना होतेय मदत!

मूलच्या दोन तरूणाची भन्नाट कल्पना — राज्यातील हजारो युवकांना होतेय मदत!

TyperG

मूल येथील आय टी क्षेत्रातील दोन तरूणांच्या मनात एका कल्पनेने घर केले. कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, या प्रयत्नातून आकारास आली TyperG! हीच TyperG आता राज्यातील कॉम्प्यूटरवर टायपिंग (शासनमान्य  GCC-TBC कंप्यूटर कोर्स) शिकणार्यासाठी वरदान ठरत आहे. 

मूल येथील मागील 40 वर्षापासून टायपिंग प्रशिक्षण क्षेत्रात नामांकीत अलंकार टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक अजय सिध्दावार यांचा मुलगा प्रतिक सिध्दावार व कॉम्प्यूटर क्षेत्रात वेगळे काही करून आपला ठसा उमटविणारा एस. शेंडे या दोन तरूणांनी एकत्र येत TyperG विकसीत केले. प्रतिक सिध्दावार हा युवक नामांकीत इंजिनिअरींग कॉलेजमध्ये बी.ई. आय.टी.चे शिक्षण घेवून, काही काळ मुंबई आणि पुणे येथे आय.टी. कंपनीत नौकरी केल्यानंतर, कोरोणा काळात 'वर्क फ्राम होम'च्या माध्यमातून मूल येथून काही काळ जॉब केला. या कालावधीत आपल्या वडिलांचा टायपिंग ​इन्स्टिट्यूटचा व्यवसाय आपल्याकडे घेत, राज्य शासनाने नव्यानेच विकसीत केलेला 'कॉम्प्यूटर टायपिंग' कोर्स जी.सी.सी., टि.बी.सी. मध्ये भरारी घेतली. 

कॉम्प्यूटर टायपिंग प्रशिक्षणात आपले आय. टि. कौशल्य दाखविल्यांने, विद्यार्थानीही या कोर्समध्ये प्रवेशासाठी गर्दी करून जबरदस्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्याना प्रशिक्षण देत असतांनाच, सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणारे ॲन्ड्राईड ॲप्स आहेत, मात्र कॉम्प्यूटर टा​यपिंग प्रशिक्षणाची ऑनलाईन प्रशिक्षण देणारे, जी.सी.सी., टि.बी.सी. प्रशिक्षणार्थाला मदत करतील असे कोणतेच ॲप्स नसल्यांचे प्रतिक सिध्दावार यांचे लक्षात आले. त्यांनी ही बाब बल्हारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीत बी.टेक.ला शिकत असलेला आपला मित्र एस. शेंडे यांचे लक्षात आणून दिली. लगेच या दोघांनीही जी.सी.सी., टि.बी.सी. प्रशिक्षणार्थाना मदत होईल अशा ॲप्सची डिजाईन तयार केली आणि अखेर कॉम्प्यूटरवर टायपिंग शिकणार्या विद्यार्थासाठी  TyperG तयार झाले. 
गुगलचे प्ले स्टोअरवर  TyperG उपलब्ध असून, तीथून डाउनलोड करून, कुणालाही ते वापरता येत आहे. पहिल्या आठ दिवसातच कुठल्याही जाहीरातीशिवाय राज्यातील 5 हजारच्या वर  TyperG डाउनलोड करण्यात आल्यांने, या ॲप्सची उपयुक्तता आणि लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.  
TyperG मध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतील कॉम्प्यूटर टायपिंग कसे करायचे याचे धडे दिले आहेत. याशिवाय शब्दाची प्रॅक्टीस, स्पीड टेस्ट, इंग्रजी, मराठी, हिंदी 30, 40 श.प्र.मी.चे नोट्स, लेटर, स्टेटमेंटची प्रॅक्टीस, माहिती, जी.सी.सी., टि.बी.सी. परिक्षेत विचारले जाणारे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न, या परिक्षेची टेस्ट, परिक्षेची व टायपिंगची स्पीड कशी वाढवायची यांचे व्हिडीओसह सविस्तर माहिती दिली आहे.  
TyperG मुल पासून मुंबई पर्यंतचे हजारो विद्यार्थानी डाउनलोड करीत आमचा उत्साह वाढविल्यांने आम्ही आणखी असे उपयुक्त ॲप्सची निर्मीती करीत असल्यांचे प्रतिक सिध्दावार आणि एस. शेंडे यांनी सांगीतले.

२ टिप्पण्या:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]