चिमूर-चंद्रपूर चालणाऱ्या साई ट्रॅव्हल्स वर चंद्रपूर परिवहन विभागाची धडक कारवाई..
वरोरा.. जगदीश पेंदाम

 परिवहन विभागाची दिशाभूल करत चुकीच्या नंबर वर वाहन चालविल्याने कारवाई करण्यात आली...
दि. २८ सप्टेंबर ला चिमूर-चंद्रपूर चालणाऱ्या साई बालाजी ट्रॅव्हल्स ला शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रपूर परिवहन विभागाचे अधिकारी गस्तीवर असताना काही शंका आल्यामुळे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमानुल अन्सारी यांनी साई ट्रॅव्हल्स नंबर एम. एच.  ३४ ए. बी. ८२५१ थांबवून पाहणी केली असता त्यांना वाहणातील कागदपत्र तपासणी करताना शंका आल्यामुळे वाहनाचे चेचिस नंबरची तपासणी करण्यात आली. परंतु चेचिस नंबर हा तपासला असता त्या नंबर वर सदर वाहन क्रमांक हा नोंदणी नसल्याचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अन्सारी यांचे लक्षात आल्यामुळे सदर वाहन मालक परिवहन विभागाची दिशाभूल करुन फसगत करीत असल्याचा व शासनाच्या लाखो रुपयाचा टॅक्स बुडवत असल्याचे लक्षात आल्याने काल दि. २८ सप्टेंबर ला सदर ट्रॅव्हल्स वर कारवाई करुन पोलीस स्टेशन शेगाव येथे लावण्यात आली. सदर ट्रॅव्हल्सची संपुर्ण चौकशी करुन समोरील कारवाई करण्यात येईल असे परिवहन विभाग चंद्रपूर यांचे कडून सांगण्यात आले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]