नागरिकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला -बेंबाळ येथील घटना


file photo

बेंबाळ (प्रतिभा मारगोनवार)
बेंबाळ येथील गाव तलाव जवळ अद्यात व्यक्तिच्या स्कारपीओने विद्युत खांबाला धडक दिल्याने खांब तुटून रस्त्यात जीवंत तार पसरले.
खांबाला धडक मारल्यानंतर वाहन चालक मूलकडे पसार झाला. ही बाब बाबराडाकडे जात असलेल्या प्रशिक वाळके, मनीष मेश्राम या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बेंबाळ येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर पगडपलीवार यांना फोन केले. किशोर पगडपलीवार हे आपल्या मित्र-मंडळी सह घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लाइनमेंन मेश्राम यांना यांना फोन करुन जीवंत तार रोडवर पसरले असल्याने धोका होऊ शकतो ही बाब लक्षात आणून दिली. जिवंत ताराची विल्हेवाट करण्यास सांगितले. या प्रसंगी दीपक कोटगले, उमाकांत मड़ावी, रंजीत गेड़ाम आणि विशाल कत्रोज़वार या गावकऱ्यानी किशोर पगडपलीवार यांच्या आवहानाला प्रतिसाद देत तत्काळ घटना स्थळावर दाखल होवून प्रवाशी नागरिकांना तत्काळ थांबवून त्यांना माहिती देत होते आणि होणाऱ्या दूर्घटनेपासून नागरिकांना सतर्क करुन तिथेच थांबविले.
जिवंत तार सुरक्षित केल्यानंतरच प्रवाशांना जाऊ देण्यात आले. दीपक कत्रोजवार नागरिकांनी समय सुचकता दाखवल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]