प्रशांत वसुले ठरले उत्कृष्ट अभियंता माळी समाज तर्फे स्वागत
 स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील उपविभागीय अभियंता प्रशांत चंद्रकांत वसुले यांना सन 2021- 22 या कालावधीमध्ये अभियंता म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासनाने वैयक्तिक पुरस्कार जाहीर केला असून १५ सप्टेंबर अभियंता दिनी मुंबई येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमास सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांच्या कार्यकाळात अनेक वास्तूची निर्मिती झाली तसेच विविध नद्यांवरील पूल चिरोली सुशी आणि मारोडा भादुर्णी मार्गावर निर्माण करण्यात आलेले फुल काम बंधारे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी सहकारी अभियंतांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेले आहे. माळी समाज वार्ड क्र. 2-3 कडून प्रशांत वसुले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रवीण मोहुर्ले माजी उपाध्यक्ष नगर परिषद मुल, बाळकृष्ण निकोडे, किशोर मोहुर्ले, मनीष कावडे, मोरेश्वर लोणबले, नरेंद्र महाडोळे तसेच वार्डातील इतर नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]