मुल तालुक्यात होत आहे युरिया खताचा तुटवडा कृषी अधिकारी मेश्राम साहेब हे अनिल अग्रो ट्रेडर्स येथे तात्काळ हजर शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे पुढाकाराने सर्व शेतकऱ्यांना खत उपलब्ध
गेल्या कित्येक दिवसांपासून मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होत आहे,मुल.तालुक्यात धान हे प्रथम प्राधान्य असून आता धानाला युरिया खताची अत्यंत आवश्यक आहे,परंतु शेतकरयांना अनिल अग्रो ट्रेडर्स मधून खत उपलब्ध होत नव्हते,काही शेतकरी फोन द्वारे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे शी संपर्क साधला असता,अनिल आग्रो ट्रेडर्स सोसायटी येथे कृषी अधिकारी यांना घेऊन समस्या जाणून घेतली,शेतकरी आता युरिया खताची मागणी करीत आहे,आणि सर्व शेतकरी अनिल एग्रो ट्रेडर्स मधून युरिया खत उपलब्ध होत नसल्याने सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून,शेतकरयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,कृषी अधिकारी यांना धारेवर घेतले असता अनिल अग्रॉ ट्रेडर्स मुल येथे उपलब्ध असलेला युरिया खताचा साठा त्वरित शेतकऱ्यांना  उपलब्ध करून देण्यात आला,आणि शेतकर्यांची खताची अडचण दूर केली,या करिता शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी महत्वाची भूमिका बजावली असता कृषी अधिकारी मेश्राम साहेब तथा  तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशांत गट्टूवार यांचे अभार मानले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी माहिती दिली की या शेतकरयांना त्रास झालं तर शिवसेना (ऊ.बा.ठा) पुढे खपवून घेणार नाही,शिवसेना स्टाईल नी आंदोलन करून शेतकरयांना न्याय दिल्या शिवाय शांत बसणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]