सावली तालुक्यात धान खरेदी केंद्राची कमतरता - पणन महामंडळाच्या जाचक अटीमुळे खरेदी केंद्राची खरेदीकडे पाठ @ कसे विकायचा कुठे ? शेतकऱ्यांना प्रश्न

सावली (विजय कोरेवार) - धान उत्पादक तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावली तालुक्यात फक्त एकाच धान खरेदी केंद्राला परवानगी मिळाली आहे तर इतर संस्था  शासनाच्या जाचक अटीमुळे खरेदीस उत्सुक नसल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना धान कुठे विकायचा हा प्रश्न पडला आहे. सध्या ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असतांना शेतकरी संस्थांचे पायरीवरून परत येत असल्याचे दिसत आहे.
     सावली तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ओळखला जातो. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यास आधारभूत किमतीतीच्या कमी किमतीत धान्य विकावे लागू नये यासाठी शासन धान्य खरेदी करते. महाराष्ट्रात दी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई च्या माध्यमातून शासन धान्य खरेदी करीत असते. सावली तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी संस्था सावली,  पाथरी, व्याहाड खुर्द, व्याहाड बुज., अंतरगाव पाच केंद्रामार्फत धान खरेदी केल्या जात होती. मात्र यापैकी फक्त  श्री किसान सहकारी भात गिरणी मर्यादित व्याहाड बुज. ला धान खरेदी करण्याची परवानगी मिळाली असून शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. मात्र इतर संस्था खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी संस्थेला पणन महामंडळाकडे 20 लाख रुपये बिनव्याजी डिपॉजिट करावी लागणार आहे, 50 लाख रुपये बँक ग्यारंटी व एक कोटी रुपये किमतीचा बोझा नोंद करावी लागणार आहे. या  पणन महामंडळाच्या जाचक अटीमुळे खरेदी प्रक्रिया परवानगी मिळविण्यासाठी संस्था पाठ दाखवीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा भार एकाच संस्थेवर पडणार असून ऑनलाईन नोंदणीसाठी गर्दी होत आहे तर नियमित खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी जाऊन शेतकऱ्यांना माघारी हिरमुसले होऊन परत यावे लागत आहे. यामुळे आपले धान कसे विकावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून जाचक अटी शिथिल करून जास्तीत जास्त केंद्र सुरु करावे ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संस्थेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. त्यातही खरेदी व्यवहार केलेल्या धान्याचे मेहनताना 4-4 वर्ष मिळत नाही, संस्थेचे माल साठवून ठेवलेले गोदाम भाडे नियमित मिळत नाही, धान्याची उचल लवकर होत नसल्याने तूट येत असते परंतु शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून याकडे दुर्लक्ष करून संस्था खरेदी करते मात्र यावर्षी आणखी जाचक अटी लादल्यामुळे  संस्थेला आर्थिक नुकसान करून खरेदी करावी लागणार असल्याने संस्था उत्सुक नाही.
             प्रा. दिपक जवादे
                   अध्यक्ष
 विविध कार्यकारी सहकारी संस्था व्याहाड खुर्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]