नागभीड तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती      
नागभीड:
      नागभीड तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक दिनाचे औचित्य साधून कैलास सत्यार्थी फाउंडेशन नवी दिल्लीच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक जनजागृती दीप जलाओ अभियान नोबल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून चंद्रपूर जिल्ह्यात  नागभीड तालुक्यातील नवेगाव (पांडव ),कोजबी, मोहाडी,कांपा,बिकली,वैजापूर चारगाव (चक ), येनोली (माल ), सोनापूर आदी गावासह 35 पेक्षा अधिक गावामध्ये स्नेहल ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादचे प्रतिनिधी अरुण बारसागडे, कुणाल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमात  गावातील सरपंच, पोलीस पाटील,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका, महिला बचत गट अध्यक्ष /सदस्य, तरुण मुले मुली, शाळकरी मुले, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते. बालविवाह हा देशातील कलंक असून तो नष्ट झालाच पाहिजे, या आत्मविश्वासाने ग्रामस्थ कार्यक्रमात उपस्थित राहून  निघालेल्या गावातील रॅलीत  सहभागी झाले होते. रॅलीमध्ये बालविवाहाचे संदेश देणाऱ्या रंगीत पोस्टर्स तसेच नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांची संदेश पत्रके घेऊन मुली सहभागी होऊन गावा गावामध्ये रॅली काढण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]