नेरी,मालेवाडा जंगलातुन अवैधरित्या रेती तस्करी सर्रास सुरू

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालुक्यातील नेरी,मालेवाडा जंगल परिसरातुन अवैधरित्या रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.शनिवार , रविवार ला सुट्टी च्या दिवसी रेती व मुरमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमानात होत असते.अश्यातच शनीवार च्या रात्री व रविवार सकाळला ट्रॅक्टर व गाढवा द्वारे रेती तस्करा कडून रेती ची तस्करी होत आहे.या तस्करानी नवीन पध्दत शोधली आहे गाढवाच्या सहाय्याने नाल्यातुन रेती चा साठा जमा करायचा आणि रात्री किंवा पाहाटेला ट्रॅक्टर द्वारे रेती घेऊन जायचे या पध्दतीने सर्रास खुलेआम रेतीची तस्करी केली जात आहे. याकडे वनविभाग व महसुल विभागाने पाठ फिरवली असे चित्र दिसत आहे. या अवैधरित्या सुरु असलेल्या रेतीच्या वाहतूकीमुळे  रोड ने पाहटेला फिरायला वयोवृद्ध तसेच विद्यार्थी येत असतात.रोडच्या बाजूला व्यायाम करीत असतात.रेती भरलेली ट्रॅक्टर हे भरधाव फुल स्पीड मध्ये वाहतूक करीत असतात.आणि कट मारत ट्रॅक्टर चालवत असल्याने यामुळे जनतेला व्यायाम सुद्धा करता येत नाही. अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.याकडे पोलीस विभागाणे लक्ष देण्याची गरज आहे. काही महसूल विभागाचे कर्मचारी वरीष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता स्वत:च्या फोर व्हीलर वाहनाने रात्रोला पेट्रोलींग करीत असतात. कुणी जर फोन करून बोलावले तर कर्मचारी व अधिकारी कोणतेही काहीतरी कारण सांगून येण्यास नकर देत असतात. बाेलावल्या नंतर हातमिळवणी होत नसते. म्हणूनच या कर्मचाऱ्याना सर्व अवैध ठिकाने माहित असतात व अवैध उत्खनन करणाऱ्या सोबत घनिष्ठ सबंध असते जिते सबंध असते तीथे जात नाहीत जीथे नसतात तीथे जात असतात. व त्यांची वाहने शुध्दा पकडली जातात. या आर्थिक देवाण घेवाण मुळे वरीष्ठ अधिकारी कमी पगारातून सुद्धा महागड्या चारचाकी वाहनाने दैनंदिन फिरत असतात. अश्या कर्मचाऱ्या वर शुध्दा वरिष्ठ अधिकारी यांनी पाळत ठेवून कारवाई करायला हवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]