तळोधी बा. तं.मु.स. अध्यक्षपदी सतत दुसर्यांदा सचिन मदनकर यांचीच निवड.यश कायरकर,(तालुका प्रतिनिधी):
      नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या सभागृहात पार पडली. या वेळी या ग्राम सभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
 यावेळी बहुमताने श्री सचिन मदनकर यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी म्हणून अविरोध निवड करण्यात आली.
      नागभिड तालुक्यातील  तळोधी (बा.) ही पोलीस स्टेशन व अप्पर तालुका कार्यालय असलेली  ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मंगळवारी ग्राम पंचायतीं  अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सरपंच राजेश घिये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेत  महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या २५ सदस्यिय समिती चे अध्यक्षपदी श्री सचिन मदनकर यांची त्यांचे मागच्या समितीतील अध्यक्षपदाचे सराहणीय काम लक्षात घेता, दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली.  यावेळी तंटामुक्त समितीचे इतर २४ सदस्यांची सुद्धा निवड यावेळी करण्यात आली.
     यावेळी ग्रामविकास अधिकारी मीनाक्षी बन्सोड, ग्रा. पं. सदस्य सुधाकर कांबळी, सोनू नंदनवार, कल्पना मस्के, नरेंद्र खोब्रागडे आदी ग्रा. पं. सदस्यांसह वामन नितीन कटारे, बाळू पाकमोडे, कृष्णा बोळणे, राहुल मदनकर, अरुण हजारे, बाळू कामडी, अक्षय पिसे, संजय मारबते, रवी देशमुख, अंकुश दिघोरे आदींची उपस्थिती होती. ग्रामसभेला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सचिन मदनकर हे युवक असून त्यांचे इतर युवकांसाठी कार्य हे प्रेरणादायी आहे . सचिन मदनकर यांच्या मित्रपरिवाराने त्यांना या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]