सोयाबीन उत्पादनात मोठी घट

सोयाबीन भावातही मोठी उतरन

शेतकरी राजा झाला मोठा हवालदिल

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : -  चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.दोन वर्ष पूर्वी सोयाबीनला उच्चांक मिळाला होता.त्यामुळे अनेक शेतकरी यांनी या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती.तर सोयाबीन पिकाला चांगले दर मिळेल अशी आशा होती.पण सोयाबीनच्या दरात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.सोयाबिनच्या पिकांचे भाव घसरले मात्र सोयाबीन काढणीला भाव वाढले आहेत.गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते . यावर्षी तर दसरा दिवाळीला गोड - धोड करण्यासाठी चार पैसे येईल असे वाटले असतानाच पावसाने दोन महिने वास्तव्य केल्याने पिकांवर यलो मोझॅक रोग पडल्याने सोयाबिन पिक करपून गेले.त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती.सोयाबीन पिक उत्पादनात मोठी घट झाल्याने व सोयाबीन पिकाच्या भावात मोठी उत्तरणं झाली असून शेतकरी राजा मोठा हवालदिल झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]