विद्यार्थ्यांना बँक भेटीद्वारे मिळाली आर्थिक साक्षरता.
तळोधी(बा):27/09/23
   येथील लोक विद्यालय तळोधी (बा) शाळेने इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी येथील स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकांपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तळोधी(बा) येथे विद्यार्थ्यांनी उपक्रमशील शिक्षक संतोष नन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भेट दिली.
  बँक खाते उघडणे, खात्यातून पैसे जमा करणे आणि काढणे, आणि धनादेश जमा करणे, बचत खाते आणि चालू खाते यातील फरक,लॉकर सुविधा,चेक सुविधा CSR निधी इ. यासारख्या विविध बँकिंग प्रक्रिया आणि व्यवहार विद्यार्थ्यांना बँक भेटीदरम्यान समजावून सांगण्यात आले.
   "लहान वयातच बँकेच्या कामकाजाविषयी माहिती असणे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. त्यांना लहान वयात बचत करण्याची सवय लागू शकते. आर्थिक साक्षरता ही भविष्यातील चांगल्या नियोजनाची गुरुकिल्ली आहे," असे क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक पुरस्कार 2022-23 प्राप्त शिक्षक संतोष नन्नावार यावेळी म्हणाले.
    यावेळी विद्यार्थ्यांना स्टेट बँक तळोधी (बा) चे शाखा व्यवस्थापक श्री कौस्तुभ खानोरकर आणि बँक कर्मचारी सदस्यांनी शासनाच्या विविध बँक-संलग्न योजनांची माहिती दिली.
  बँकेचे व्यवस्थापक कौस्तुभ खानोरकर यांच्यासह इतर कर्मचारी वर्गासह शाळेतील शिक्षक, नागरिक उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी समृद्धी कामडी व आभार भैरवी बोरकर हिने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]