सुगंधीत तंबाखु विक्रेत्यांवर कारवाई होणार

सुगंधीत तंबाखु विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे ना. आत्राम यांचे आदेश
मंगेश पोटवार यांच्या तक्रारीची ना. आत्राम यांनी घेतली गंभीर दखल


मूल (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासुन मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर सुगंधीत तंबाखुची सर्रास विक्री केली जात आहे, स्थानिक अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे संपर्कमंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देवुन सुगंधीत तंबाखु तस्करांवर कारवाई करण्याची मागणी केली. नामदार आत्राम आणि चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाÚयांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले असुन त्याबाबतचा अहवाल कळविण्याच्या सुचना अधिकाÚयांना केले आहे.

शासनाने सुगंधित तंबाखुवर बंदी आणली आहे, याबंदी असलेल्या तंबाखुची विक्री करणाÚया व्यापाÚयावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकारी अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहे. असे असतानाही मूल तालुक्यात या प्रतिबंधित तंबाखुची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे मात्र याविभागाचे पुर्णत्व दुर्लक्ष होत आहे. मूल तालुक्यात जवळपास 5 ते 6 तस्करांकडुन सुगंधीत तंबाखुची गावोगावी विक्री केल्या जात आहे, यामुळे लहानमुलांपासुन तर आबालवृध्दही सुगंधीत तंबाखुचे शौकीन बनत आहेत. सुगंधीत तंबाखुच्या सेवनामुळे अनेकांना कर्करोगासारखे आजार जळत आहेत, दिवसेंदिवस रूग्णांची संख्या कमालीची वाढत आहे मात्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखुची विक्री वाढतच आहे परंतु अन्न व औषध प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी शनिवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे संपर्कमंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांना भेटुन मूल तालुक्यातील सुगंधीत तंबाखुची भिषण समस्या कथन केली, यावेळी नामदार आत्राम यांनी चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाÚयांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सचिव आबिद अल्ली, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]