पोलीस स्टेशन तळोधी कडून चोरट्या रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाईपोलीस स्टेशन तळोधी कडून चोरट्या रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई
यश कायरकर; (तालुका प्रतिनिधी.)
                    दिनांक 23/10/23 रोजी पोलीस स्टेशन तळोधी येथील पोलीस कर्मचारी हे पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्त घालत असताना ठाणेदार मंगेश भोयर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्र गस्तीं वरील पोलीस कर्मचारी यांनी जीवनापूर ते वाढोणा अश्या रोड वर नाकेबंदी करून चोरटी रेती वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर क्रमांक MH 34 BF 7084 व ट्राली क्रमांक MH 34 BR 1306 ही ताब्यात घेतली, ट्रॅक्टर चालकाजवळ कोणताही रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने तीं रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर मालक 1) अक्षय दिगांबर सांगिडवार रा. सोनापूर तुकूम व ट्रॅक्टर चालक 2) विलास पुंडलिक गोबाडे रा. वाढोणा तह. नागभीड यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तळोधी येथे अपराध क्र. 255/2023 कलम 379, 34 iPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 विशेष म्हणजे याच आठवड्यात मौजा वाढोणा येथे बोकोडोह नाल्यातून चोरीच्या माध्यमातून अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर क्र.MH-34 BG-0698 वर सुद्धा कार्यवाही करण्यात आली होती. याच आठवड्यात ही दुसरी कार्यवाही असल्यामुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून सध्या तरी   अवैध रेती तस्करीला आळा बसलेला आहे.
             ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे, पोलीस स्टेशन तळोधी चे ठाणेदार मंगेश भोयर यांचे मार्गदर्शनात पो.हवा. रत्नाकर देहारे, पोलीस अंमलदार स्वप्नील चांदेकर व होमगार्ड सैनिक यांनी केली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]