राजुरा येथे आदिवासींचा चक्का जाम आंदोलन

राजुरा येथे  आदिवासींचा चक्का जाम आंदोलन 
तहसील येथे दिले निवेदन 


राजुरा /प्रतिनिधी 
राजुरा येथील संविधान चौक येथे आदिवासींनी शासनाचे विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आदिवासी मध्ये धनगर जातीला समाविष्ठ करण्याचा निर्णय नुकताच शासन जाहीर केल्याने यांचे तीव्र पडसाद उमटत असून या निर्णयामुळे आदिवासी शासनाचे विरोधात संताप व्यक्त करीत असून आता नौकरीत खाजगीकरण शासन आणत असल्याने आदिवासींचा आरक्षण धोक्यात आल्याने आदिवासी संतप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. मोर्चात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नेते महीपाल मडावी श्रमिक एल्गर संघटनेचे उपाध्यक्ष तथा ट्रायबल डेव्हलोप कल्चरल फौन्डेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम, भारत आत्राम, मधुकर कोटनाके, धीरज मेश्राम, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर बोगस हटाव-आदिवासी बचाव, एक तीर एक कमान आदिवासी एक समान, अशा घोषणा देत पंचायत समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढून नायब तहसिलदार तेलंग यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने धनगर जातीला आदिवासी मध्ये समाविष्ठ करू नये, नौकर भरतीतील खाजगीकरण बंद करुन आदिवासींचा आरक्षण कायम ठेवण्यात यावा, पेस कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पेस क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, आदिवासीच्या नौकरीतील अनुशेष तत्काळ भरण्यात यावा यासह इत्यादी मागण्यासह आदिवासींनी आंदोलन केले. यावेळी महीपाल मडावी, घनशाम मेश्राम, शुभम आत्राम, रवींद्र आत्राम, विनोद गेडाम, अमृत आत्राम, अंकुश कुळमेथे, मधुकर कोटनाके, धीरज मेश्राम , बंडू मडावी, भारत आत्राम,अंकिता मडावी, शुभांगी उईके, लक्ष्मी मडावी, मालताबाई मडावी, सुचिता आडे, वचला  सिडाम, मंदा आत्राम, यासह इत्यादींनी मोर्चात सहभागी होहून शासनाचे लक्ष वेधले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]