तळोधी (बा.) ट्राफिक पोलिसांचा परिसरातील शेतकरी व मजुरांच्या खिशावर डाका,तर तळोधीतील स्थानिक लोकांकडे व अवैद्य वाहतुकीकडे दुर्लक्ष.
  यश कायरकर (तालुका प्रतिनिधी):
  तळोधी बाळापुर येथील ट्राफिक पोलीस हे नेहमी वाढोणा, सावरगाव, गंगासागर हेटी, आकापुर, ऊश्राळा मेंढा, आलेवाही, कन्नाळगाव, हस्तानपुर, खरकाळा, जिवनापूर, या परिसरातील लोकांना रस्त्यात अडवून त्यांच्या गाड्या चालान करताना दिसून येतात.  त्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्ह च्या केसेस, ट्रिपल सीट, गाडीचे कागदपत्र नसण्याच्या, तर कधी हेल्मेट व लायसन्स नसल्याच्या कारणाने मोठ्या प्रमाणात अशा गाड्या चालकांवर चालनचा भुर्दंड बसवितात.     
            यामध्ये तर दहा हजार रुपयांचा पर्यंत गोरगरिबांना न परवडणारे भुर्दंड भरून द्यावा लागते.
     परिसरातील शेतकरी, शेतमजूर हे तळोधीला बाजारपेठ असल्याने कामाला जातात. मात्र येताना तिथेच देशी दारूचे दुकान असल्यामुळे थोडी दारू घेऊन परत येत असतात. तर कोणी दवाखान्याच्या कामाला तळोधी येथील दवाखान्यांमध्ये उपचाराकरिता ट्रिपल सीट जात असतात,  तर कोणी शेताचे काम अर्धवट सोडून शेतातूनच शेतीच्या औषधे, खत , आणण्याकरिता तळोधी बा. मध्येच मुख्य बाजारपेठ असल्याने तिथे निघून जातात. मात्र त्यावेळेस त्यांच्याकडे या वेळी हेल्मेट किंवा लायसन्सही नसतो व मात्र पोलिसांनी अचानक रस्त्यात अडविल्यामुळे ते कुठलेच कागदपत्र दाखवू शकत नाही व पोलिसांच्या लादलेल्या चालनाच्या (दंडाच्या)  स्वरुपात हजारो रुपये भरून द्यावा लागतो.
         मात्र प्राप्त माहितीनुसार ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या व त्यांना मिळवून देणाऱ्या टारगेट पूर्ण करण्याकरता रोज कुठल्या ना कुठल्या गाड्यांवर स्थानिक पोलिसांना चालन करावा लागतोच व दंड आकारावा लागतो  ही एक प्रकारची गरिब व मजुरांच्या खिशावर होणारी लूट, रस्ते वाहतूक नियमांसाठी योग्य असली तरी ही फक्त गोरगरिबांवरच कारवाई का..? असा परिसरातील लोकांना प्रश्न पडला आहे.    
               कारण तळोधी मधील स्थानिक किंवा आजूबाजूच्या परिसरातील राजकीय लोक, नेमके ओळखीचे चेहरे असलेल्यांवर हे पोलीस कुठलीही कारवाई करत नाही. तर आवर्जून तळोदी मधील कुठल्याही व्यक्तीवर दारू पिऊन इकडून तिकडे फिरत असताना , तळोधी च्या मुख्य रस्त्यावर किंवा शिवाजी चौकामध्ये रात्रीच्या खूप उशिरापर्यंत भटकत असताना, बिना परवाना गाड्या चालवत असताना, बिना हेल्मेट, बिना लायसन्स ने कॉलेजच्या समोरून लहान लहान मुलं पोलीस स्टेशन समोरून मुलींना छेडखानी करत दुचाकीने इकडून तिकडे फिरत असताना. ह्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही..? किंवा अवैध  व्यवसायिकांच्या दारू गाड्या, रेतीच्या गाड्या, बैलांच्या भरून जाणाऱ्या गाड्या, लोकांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या किंवा मोठमोठाले बिना नंबर प्लेट चे ट्रक याकडे या पोलिसांचा लक्ष का नसतो..?


    मात्र वरिष्ठ लीडर व अधिकाऱ्यांचा मान राखन्यात, श्रीमंत व ओळखीचे दुचाकी गाड्यांकडे यांचा दुर्लक्ष का.? आणि गोरगरिबांवरच यांचा भुर्दंड का..? असा प्रश्न निर्माण करून लोक तळोधी बा. व ट्राफिक पोलीस विरोधात नाराजी व्यक्त करु लागलेले आहेत.
"नागपूर - तळोधी - शिंदेवाही हा राज्यमार्ग आहे, अपघाताचे प्रमाण खूप वाढल्यामुळे अपघातावर नियंत्रणा करिता केसेस करणे हे आमची जिम्मेदारी आहे. जेव्हापासून तपासणी सुरू केली रस्ते अपघात कमी झालेले आहेत. त्यामुळे या चौकशीच्या वेळेस जे दारू पिऊन आढळले त्यांच्यावर कारवाई होईल."
- मंगेश भोयर, ठाणेदार  पोलीस स्टेशन तळोधी (बा.)
"तळोधी पोलिसांच्या कारवाई मध्ये आमच्या खेड्यापाड्यावरून कामांकरिता तळोधी ला येणारे गोरगरिब बळी पडत आहेत. मात्र मोठमोठाले ट्रक किंवा स्थानिक लोक यांच्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांनी  परिसरातील लोकांना मुभा द्यावी, संपूर्ण परिसरातील संपूर्ण सरपंच आम्ही यासंदर्भात तळोधी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत"
- श्री हेमंत लांजेवार, अध्यक्ष सरपंच महासंघ जिल्हा चंद्रपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]