सावली तहसीलदारांनी बोलावली बैठक - सावली तालुक्यातील गावे मुल तालुक्यातील ग्रामपंचायतला समाविष्ट असल्याचा प्रकार

सावली - मूल तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव ही गावे अंतर्भूत असून ग्रामपंचायत कार्यालय मूल तालुक्यात असताना महसूली गावे मात्र सावली तालुक्यात आहेत.  त्यामुळे प्रवासाच्या व विकासाच्या दृष्टीने गावकऱ्यांना अडचणी येत आहेत. ही बाब तहसीलदार परीक्षित पाटील यांचे लक्षात आल्याने त्यांनी 26 ऑक्टोबरला बैठक बोलावली आहे.
    सावली तालुक्यात मानकापूर,चक मानकापूर, मेटेगाव, सादागड, सादागड हेटी ही संपूर्ण आदिवासी लोकवस्तीची गावे आहेत. शेती ही सावली तालुक्यातील पेंढरी, खेडी तलाठी साज्यात आहे. या गावातील सर्व व्यवहार हे सावली तालुका मुख्यालयातून होत असतात. घरकुलची कामे, रोजगार हमीची कामे सावली पंचायत समितीमधून होतात मात्र ग्रामपंचायत मूल तालुक्यातील मुरमाडी, टेकाडी ही आहेत. या तिन्ही गावापासून गावाचे अंतर 7 किलोमीटर आहे पण जंगलाची पायवाट असून पक्का रस्ता नाही, हिंस्त्र प्राण्यांचा संचार असतो व या पायवाटेने फक्त उन्हाळ्यात जाता येते. इतर ऋतुमध्ये सावली ते मूल नदीपासून ते राजोली येथून मुरमाडी येथे ग्रामपंचायचे कामासाठी जावे लागते. 
       गावकऱ्यांची ही अडचण लक्षात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी तहसील कार्यालयात 26 ऑक्टोबरला 11 वाजता बैठक आयोजित केली असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, तलाठी पेंढरी, खेडी व ग्रामसेवक चारगाव, पेंढरी, सरपंच व सदस्य यांना माहितीसह उपस्थित राहण्याचे कळविले आहे.   
    
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]