24 तास जनसामान्याची सेवा करणारा मुलचा अवलिया


आज सकाळी स्मशानभूमीची स्वच्छता करून येत असताना स्वच्छता मित्राने दिला मदतीचा हात. मूल नगर परिषदेचे सफाई कामगार विशाल केंद्रे यांचा अपघात चामोर्शी नाक्याजवळ झालेला होता. वीस मिनिटांपासून कोणीतरी दवाखान्यात नेईल याची वाट बघत होते सगळे बघ्याची भूमिका घेताना दिसले, हाताला मार लागला असून रक्त बंबाळ झालेला होता. सगळे दुरूनच बघत होते, स्मशान भूमीची स्वच्छता करून येत असताना स्वच्छता मित्रा, गौरव शामकुले व बबलू गेडाम यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला उचलून टु व्हिलर च्या साह्याने जिल्हा उप रुग्णालय मुल येथे दाखल केले व उपचार करण्यास सांगितले. गेल्या सहा वर्षापासून निस्वार्थ परिसरातील स्वच्छता करणारा अवलिया 24 तास जनसामानाच्या सेवेत निस्वार्थ सेवा देत आहे. सामाजिक, राजकीय, व्यवसायिक, कार्यात आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे.
कुठलीही अपेक्षा न ठेवता अविरत कार्य दोन तास सहा वर्ष मनत रोज स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवत विरोधात बोलण्याचा धाडस प्रत्येक वेळी ते करत असतात. आंदोलन असो, जनसामान्याचे प्रश्न असो, यात ठामपणे उभे राहून प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा काम करताना ते दिसत आहेत. राजकीय पक्षात असतानाही आपल्याच पक्षाच्या नेत्यांसोबत विरोधात बोलताना पण ते दिसतात. काम करण्याची वेगळी पद्धत, जनसामान्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. सकाळी दोन तास स्वच्छता करून आपला व्यवसाय सांभाळून जनसामान्याची सेवा ते करत असतात. मुल तालुक्यात प्रसिद्ध स्वच्छता मित्रा म्हणून त्यांनी आपली ओळख बनवलेली आहे. गौरवचा गौरव करण्यासारके त्यांचे काम तालुक्यात दिसत आहे. लहानापासून मोठ्यांच प्रेम कुठे कमी होताना दिसत नाही. रस्त्यांना जातानाही सगळ्यांसोबत बोलणे प्रश्न ऐकणे तात्काळ कामाला सुरुवात करणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम.
 मूलवासिय त्यांच्या सदैव पाठीशी उभे असतात, स्वच्छता मित्रा टीमला मुलवाश्यांचा मानाचा सलाम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]