डॉक्टरविना 'आपला' दवाखाना

 डॉक्टरविना आपला दवाखानाराज्यातील महायुती सरकारने गाजावाजा करून सुरू केलेला हिंदूहृदृय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता वैद्यकीय अधिकाऱ्याशिवाय देखाव्याची वास्तू ठरत असून, डॉक्टरविना आपला दवाखाना रूग्णांच्या 'सेवेत' आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आपला दवाखाना मध्ये नेमण्यात आलेले जवळपास सर्वच वैद्यकीय अधिकारी हे उच्च शिक्षणाकरिता आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सर्वच आपला दवाखाने वाऱ्यावर आहेत.

आपला दवाखाण्यात एम.बी.बी.एस. दर्जाची वैद्यकीय अधिकारीचे पद मंजूर आहे. मूल येथे डॉ. कागदेलवार या आपला दवाखाण्यात सेवा देत असतांनाच दिनांक 15 आॅक्टोबरपासून, पुढील शिक्षणाकरीता, सेवेतून राजीनामा दिला.  तेव्हापासून अजूनपर्यंत पर्यायी व्यवस्था न केल्यांने, डॉक्टरविना आपला दवाखाना सुरू आहे.  या दवाखाण्यातील कर्मचारी येतात, मात्र येणार्या रूग्णावर उपचार करण्यास ते देखिल असमर्थ ठरत आहे.

एखादा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून सीएचओ ला प्रभार  दिला जाते मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी हे याबाबतीत कमालीचे उदासीन दिसून येत आहे.

मूल शहरात शहरी भागातील गरीबांना मोफत आणि त्यांना उपलब्ध वेळेत उपचार घेता यावे यासाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आला.  मूल शहरातील या दवाखाण्यात 100 च्या वर ओपीडीची नोंदणी होत असल्यांने, या दवाखाण्याची आवश्यकता अधोरेखित झाली, मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे आपला दवाखाना रूग्णांसाठी 'परका' झाला असल्यांची टिका होत आहे.

मूल शहरात एल्गार कार्यालयाच्या बाजूला 1 मे 2023 पासून आपला दवाखाना वाजत—गाजत सुरू करण्यात आला.  या दवाखाण्याचे उद्घाटन आॅनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मूल तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारीनीही उपस्थिती दर्शविली होती, मात्र दवाखाना नियोजीत वेळेत सुरू न होणे, नियोजीत वेळेपर्यंत न चालणे, वारंवार डॉक्टरांची गैरहजेरी, पॅथालॉजीच्या रिपोर्ट महालॅबकडून नियमीत व वेळेत न मिळणे यामुळे हा दवाखाना चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]