मुलं शहरातील समस्या सोडविण्यासाठी नाम. अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुख्याधिऱ्यांची भेट
विहीरगावं वार्ड क्रमांक 16  मधील समस्यांना घेऊन मुल नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी श्री पवार साहेब यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात वॉर्डातील नागरिकांनी भेट  घेऊन त्यांच्यासमोर वार्डातील समस्या मांडल्या यात प्रामुख्याने बुद्ध विहारा जवळील श्री पप्पु मेश्राम यांच्या घरासमोरील अर्धवट नाली बांधकाम आणि मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांमध्ये असलेल्या गॅप मुळे नागरिकांना येजा करण्यासाठी होणाऱ्या त्रासाची माहिती मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली.
तसेच वार्ड क्रमांक 16 मधीलच शेंडे ते चिकाटे या रस्त्याचे नाली व रस्ता बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे  त्यामुळे मूल नगरपरिषद प्रशासनाने रस्ते आणि नालीचे बांधकाम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती मुल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना करण्यात आली. या दोन्ही समस्या नागरिकांना फार त्रासदायक  असल्यामुळे माननीय मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानें तात्काळ या समस्या सोडविण्याची विनंती केली असता मा. मुख्यअधिकारी यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आकाश येसनकर, प्रणय रायपुरे, वतन चिकाटे,सौरभ वायडे,कृष्णा बोरेवार, रजत कुकडे, प्रज्वल नागपुरे, साहिल खोब्रागडे, सायक खोब्रागडे आदीसह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]